(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील श्री महालक्ष्मी महिला नागरी
सहकारी पतसंस्था मर्यांदित वाटद-मिरवणे खंडाळा परिसर या पतसंस्थेच्या 31 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून श्री सत्यनारायणाची महापुजा, महिलांचा हळदी कुंकू, भजन, टिपरी नृत्य असे भरगच्च कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडले.
श्री महालक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे कार्यक्षेत्र मर्यादित असतानाही या संस्थेची कामगिरी दिवसेंदिवस उंचावत आहे.परिसरातील महिलावर्ग व व्यापारी आपल्या दैनंदिन व्यावसायासाठी पतसंस्थेकडून मोठ्या विश्वासाने देवाण घेवाण करीत असतात. या वर्धापन दिन कार्यक्रमाचे उत्तम नियोजन संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा श्रीमती नम्रता पवार, संचालक शितल प.जोग, सौ निता सुधाकर शिर्के, वृशाली काळे, श्रावणी जंगम व सर्व संचालक यांनी यशस्वीपणे केले.तसेच पतसंस्थेचे कर्मचारी,ग्रथालय कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.
या कार्यक्रमाला ग्रामविकास मंडळ वाटद-मिरवणेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुदत्त निमकर, विद्यमान अध्यक्ष मधुसूदन वैद्य, सचिव मा.सुधाकर शिर्के, कोषाध्यक्ष राजेंद्र भडसावळे, कार्यवाह प्रकाश कारखानीस, संचालक पर्शुराम जोग यानी उपस्थीत राहुन पतसंस्थेच्या सर्व संचालक मंडळाचे कौतुक करुन वर्धापन दिनानिमित्त भावी यशस्वी वाटलीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पतसंस्थेच्या संचालक श्वेता चाळके, अश्विनी खरात, सुगंधा जांभळे, शुभांगी दुर्गवळी व सर्व संचालक यांचेही उत्तम सहकार्य लाभले.
सायंकाळी जांभारी येथील महिलांनी भजन व वाटद मांजरेकरवाडी येथील महिलांनी टिपरी नृत्य सादर केले. शेवटी अध्यक्षा नम्रता पवार यांनी सर्वाचे आभार मानले.
संस्थेच्या उभारणी मध्ये ग्रामविकास मंडळ वाटद मिरवणे या संस्थेचे मोठे योगदान असून त्यांचे मार्गदर्शनाने संस्थेचे कार्य चालू आहे. सध्या खंडाळा येथील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी संस्थेच्या वाचनालयाच्या इमारतीमध्ये पतसंस्थेचे कार्य चालू आहे. संस्था खंडाळा परिसरातील अनेक महिला सभासदांना त्यांच्या ठेवी व कर्जाच्या स्वरूपात सेवा देऊन महिलांना व्यवसायाभिमुख करण्याचा प्रयत्न संस्था करत आहे.