गेली 25 वर्षे सहकार क्षेत्रात कार्यरत असलेले शकील गवाणकर यांची श्री निरिपजी को ऑप क्रेडिट सोसायटी मुंबई या संस्थेवर सहकार तज्ज्ञ सल्लागार पदी निवड करण्यात आली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष भूपेशजी मोरे व उपाध्यक्षा सौ मेघनाताई यांनी शकील गवाणकर यांच्या अनुभवाचा आपल्या संस्थेला निश्चित उपयोग होवून तळागाळातील दुर्बल लोकांना सबल करण्यासाठी आपण एकत्रित प्रयत्न करु असा विश्वास व्यक्त केला.या पतसंस्थेची शाखा रत्नागिरी येथे सुरू करण्यात आली असून अल्पावधीतच या संस्थेने अनेक सभासद केले असून गरजूंना कर्जवाटप ही केले आहे . दैनंदिन ठेव योजना,आवर्त ठेव योजना,मुदत ठेव योजना व्यतिरिक्त वैयक्तिक कर्ज,सोने तारण, वाहन खरेदी साठी कमी व्याजदरात योजना सुरू झाली आहे.
आपल्या कार्यावर विश्वास टाकून जी जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीची जाणीव ठेवून मी सर्व पदाधिकारी,संचालक यांना तसेच सभासद यांना विश्वासात घेवून काम करु आणि गेली 32 वर्षे ज्या पतसंस्थेने प्रामाणिकपणे काम केले अशा पतसंस्थेवर मला काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले .
शकील गवाणकर हे संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे अध्यक्ष असून ते पत्रकार आहेत.त्यांच्या निवडीने संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी च्या सर्व पदाधिकारी व सभासदांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.