(रत्नागिरी / प्रतिनिधी)
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल झाडगाव रत्नागिरी येथे विद्यालयातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांकरीता सायकलचे वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे आजीवसेवक तथा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शशिकांत काटे, रोट्रॅक्ट क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनचे प्रेसिडेंट श्री.आर्य आंबूलकर, सेक्रेटरी श्री.राजस सुर्वे, ट्रेझरर कु.झलक जैन, सायकल देणगीदार आणि रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनचे चार्टर प्रेसिडेंट श्री. वसंतजी भणसारी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रीतम पिलणकर, स्कूल कमिटी अध्यक्ष अशोक पवार, शिक्षक तानाजी गायकवाड, क्लब सदस्य आकांक्षा साळवी, स्नेहल राऊत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साही वातावरण संपन्न झाला.
या कार्यक्रमाची सुरुवात संस्था प्रार्थनेने इशास्तवनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे विद्यालयाच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. आपल्या प्रास्ताविकातून विद्यालयाचे मुख्याध्यापक व संस्थेच्या आजिवसेवक श्री शशिकांत काटे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. यानंतर इयत्ता 7 वी मध्ये शिकणारी कु. रुद्रा शिंदे व इयत्ता 8 वी मध्ये शिकणारी श्रावणी घोसाळे या 2 गरीब व गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले. जवळपास 5 ते 6 किलोमीटर चालत येणे आणि तितकेच अंतर चालत जाणे या मुलींना भारी पडत होते आणि हीच गरज ओळखून या दोघींना सायकल वाटप रोट्रॅक्ट क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन यांच्या वतीने देणगीदार श्री.वसंतजी भणसारी यांच्या 60 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर तसेच विद्यालयाच्या वतीने हा उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करण्यात आले. यावेळी रोट्रॅक्ट क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनचे प्रेसिडेंट आर्य आंबूलकर, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे चार्टर प्रेसिडेंट वसंत भणसारी यांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त करून उपस्थित पाचवी ते दहावी अखेरच्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी जीवनासाठी, उज्वल भवितव्यासाठी आणि त्यांच्या करिअरसाठी शुभेच्छा दिल्या.
सायकल वाटप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. अशोक सुतार, श्री. एम. डी. पाटील, श्री. ए. ए. मंडले, श्री. सैफुद्दीन पठाण, सौ. भुजबळराव मॅडम, सागर कदम, शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. फगरे, श्री. पवार तसेच इयत्ता 10 वी च्या मुलांनी विशेष मेहनत घेतली.
विद्यालयातील सर्व अध्यापक वृंद शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी वर्गाने यावेळी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. आपल्या अनमोल आणि बहारदार वाणीतून विद्यालयाचे अध्यापक श्री. दीपक पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व सरांच्याच आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचे सांगता झाली.