रत्नागिरी शहरातील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, झाडगाव, येथे शुक्रवारी ( 17/02/ 2023) रोजी सकाळच्या सत्रात एस एस सी विद्यार्थी शुभचिंतन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. सौ. सरोज आखाडे (उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी), मा. श्री. हुसेन पठाण (आजीव सेवक श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर) व श्री.सुनील शेठ भोंगले (ज्येष्ठ उद्योजक रत्नागिरी) उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वर्षभर विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. यामध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येते. हा विद्यार्थ्यांचा खूप आवडता क्षण असतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी अभ्यास करण्याची प्रेरणा दिली. सौ. आखाडे यांनी दहावीच्या मुलांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. मा. श्री हुसेन पठाण यांनी विद्यार्थ्यांना चिकित्सक वृत्तीची जोपासना करण्याची प्रेरणा दिली व एक चांगला माणूस बनण्यासाठी मोलाचा सल्ला दिला. या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या मा. सौ. शाल्मली आंबुलकर मॅडम अध्यक्ष म्हणून लाभल्या होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने व सहकार्याने वागण्याची प्रेमळ सक्ती केली. इयत्ता नववीतील कुणाल शिंदे यांनी मनोगतातून दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तर इयत्ता दहावीतील पारस पिलणकर व हरिभाऊ गोटवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला एक छोटीशी भेट प्रदान केली.
या कार्यक्रमासाठी मा. सुप्रियाताई रसाळ मॅडम नगरसेविका रत्नागिरी नगरपरिषद, सविता बर्वे, साधना कौजलगीकर मॅडम, श्रीकांत ढालकर सर, श्री स्वामी विवेकानंद वसतिगृहाचे अधिक्षक श्री. बागडी सर व श्री.कदम सर श्री. रविकांत शहाणे सर, व्यवस्थापक, अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ, कुणबी समाज क्रांती संघटनेचे श्री. गणेश भारती सर, श्री. अशोक पवार, श्री. प्रीतम पिलणकर, श्री. मोहम्मद शेख आदी उपस्थित होते.
ध्येय साध्य होईपर्यंत कष्ट करत राहावे – सौ. जयश्री गायकवाड
संध्याकाळच्या सत्रात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अप्पर पोलिस अधीक्षक सौ. जयश्री गायकवाड मॅडम प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञान आणि विज्ञानासोबतच सुसंस्कार जपण्यासाठी मार्गदर्शन केले. मुलांनी चांगला माणूस बनण्यासाठी प्रयत्न करावे व आपल्या ध्येय साध्य होईपर्यंत कष्ट करत राहावे, असे सांगितले व त्यांनी स्नेहसंमेलनाचा आनंद देखील घेतला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. थोरात मॅडम व श्री पाटील सर यांनी केले कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !