(जाकादेवी / वार्ताहर )
महाराष्ट्र राज्य कलासंचालनालय, मुंबई यांच्या वतीने सप्टेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षा इंटरमिजिएट या परीक्षेमध्ये येथील जीवन विद्यामंडळ कसोप फणसोप, मुंबई संचालित श्रीलक्ष्मीकेशव माध्यमिक विद्यालय कोसोप फणसोप विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शासकीय रेखाकला परीक्षेत १००% निकालाची परंपरा कायम राखत उज्वल मनाचे मानकरी ठरले.
यामध्ये विक्रांत शिंदे, सुजल तोसकर, यज्ञेश विचारे, तेजल म्हादये, पूजा नायक या विद्यार्थ्यांनी “अ “श्रेणी प्राप्त केली. तर वेदांत आंबेकर, राहुल कानसरे, स्मित गोताड, रुची तेरवणकर, सानिका केळकर या विद्यार्थ्यांनी “ब “श्रेणी प्राप्त केली. परीक्षेला १० विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सर्व यशप्राप्त विद्यार्थ्यांना उपक्रमशील कलाशिक्षक उत्तम पवार यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक कलाशिक्षकांचे प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक नेत्रा राजेशिर्के, संस्था अध्यक्ष कमलाकर साळवी, शाळा समिती अध्यक्ष प्रकाश साळवी यांनी खास अभिनंदन केले.
.