(चिपळूण /ओंकार रेळेकर)
चिपळूण शहरातील सराफ, लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष राजेंद्र दत्ताराम वेस्विकर यांच्या मातोश्री जेष्ठ स्वर्गीय श्रीमती पद्मावती वेस्विकर यांचे बुधवार दिनांक २० डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता वयाच्या ८५ व्या वर्षी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शांत ,संयमी, मनमिळावू आणि परोपकारी स्वभावाच्या म्हणून स्वर्गीय पद्मावती दत्ताराम वेस्विकर सर्वांना परिचित होत्या. चिपळूण मधील सोने चांदीचे ज्येष्ठ व्यापारी म्हणून त्यांचे पती स्वर्गीय दत्ताराम वेस्विकर यांनी वेस्वीकर ज्वेलर्स नावाने चिपळूण मध्ये सुमारे ५० वर्षापूर्वी व्यवसाय सुरू केला.त्यांचा हा व्यवसाय चिरंजीव राजेंद्र यांनी श्री स्वामी समर्थ ज्वेलर्स नावाने तर दुसरे चिरंजीव महेश यांनी वेस्विकर ज्वेलर्स नावाने चिपळूण बाजारपेठेत पुढील काळात यशस्वीपणे व्यवसाय सुरू ठेवला आहे. या सर्व व्यवसायात स्व. पद्मावती वेस्विकर यांचे मौलाचे सहकार्य होते.
त्यांच्या पश्चात मुलगा राजेंद्र दत्ताराम वेस्विकर,महेश दत्ताराम वेस्विकर,मुलगी संजीवनी अडूरकर,सौ.क्रांती पोवळे आणि नातवंडे असा परीवार आहे. पद्मावती वेस्विकर यांचा दहावे विधी शुक्रवार दिनांक २९ डिसेंबर रोजी गणेशतीर्थ स्मशान भूमी उकत्ताड येथे होणार असून तेरावे विधी गणेश दर्शन बंगला उक्ताड चिपळूण येथे दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे.