(चिपळूण/प्रतिनिधी)
शनिवार ९ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १०. ३० वाजता श्रमिक कृषि संवर्धन संस्था, आरवली या संस्थेमार्फत सह्याद्री शिक्षण संस्थेच्या फुरुस येथील शावजीराव लक्ष्मणराव निकम विद्यालयातील २२ विद्यार्थ्यांना सायकल वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
श्रमिक कृषी संवर्धन संस्था ही वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवित असते.
या सायकल वाटपास मोलाचे आर्थिक सहाय्य डॉ. श्यामकांत गजमल, मा. विद्या दळवी, वसंतशेठ उदेग, विलासशेठ खेराडे, निवृत्त पोलिस निरीक्षक रमेश घडवले, प्रमोद गजमल, डॉ. प्रकाश पाटणकर, पी. टी. करावडे, जी. एस. खांबे, अरूणशेठ गजमल, वैभव कोरगांवकर, समीर गजमल, मा. जी.एस.खांबे, मा.प्रताप गजमल, मा. अनंत शिगवण गुरुजी व कृष्णा बेटकर इत्यादींनी केले.
या सायकल वाटप कार्यक्रमाला कोकणचे गाडगेबाबा प्रबोधनकार मा. मारुतीकाका जोयशी, जलनायक मा. युयुत्सु आर्ते, सावर्डे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भरत धुमाळसाहेब, श्रमिक कृषी संवर्धन संस्थेचे अध्यक्ष विलासजी डिके, अनंत शिगवण गुरुजी, नितेश दुर्गोळी, प्रा. संदिप येलये, सुरेश गांगरकर, अनिल घाणेकर, फुरुस गावचे सरपंच मा. दादा कदम, हायस्कूलचे मुख्याध्यपक कल्पेश दळवी इत्यादी मान्यवर व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.