(नवी दिल्ली)
देशभर गाजत असलेल्या श्रद्धा हत्याकांड प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला याला पॉलीग्राफ चाचणीनंतर घेऊन निघालेल्या पोलिस वाहनावर दिल्लीतील रोहिणी येथे हल्ला करण्यात आला. पॉलीग्राफ चाचणीनंतर एफएसएल टीम आफताबला घेऊन बाहेर आली. त्यानंतर जमावाने घटनास्थळ गाठून वाहनावर हल्ला केला. विशेष म्हणजे यावेळी या लोकांच्या हातात तलवारी होत्या. या जमावातील लोकं ते आफताबला मारुन टाकण्याबाबत बोलत होते. जेव्हा हल्ला झाला तेव्हा एक पोलिस व्हॅनमधून बाहेर आला आणि त्याने या लोकांवर बंदूक रोखली. त्यावेळी जमाव मागे हटला.
यावेळी संतप्त जमावाने पोलिस व्हॅनवरही दगडफेक केली. ज्या व्यक्तीने हल्ला केला तो यावेळी म्हणाला की, त्याला दोन मिनिटांसाठी बाहेर काढा, मारून टाकू. दरम्यान आफताबला घेऊन जाणाऱ्या गाडीवर हल्ला करणाऱ्या काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.