केंद्र सरकारच्या पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील नववा हप्ता लवकरच पाठवण्यात येणार आहे. ऑगस्ट महिन्यात का निधी पाठवला जाईल. लाभार्थी शेतकऱ्यांना 2000 रुपये पाठवले जाणार आहेत. आतापर्यंत या योजनेचे आठ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आले आहेत.
या योजनेसाठी जर नोंदणी केली असेल तर तुम्हाला हे माहित करणे आवश्यक आहे की, या योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही. याकरीता शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर त्याठिकाणी दिसणाऱ्या ‘फार्मर कॉर्नर’वर क्लिक करा. याठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या नावाची या योजनेसाठी नोंदणी देखील करू शकता. याठिकाणी या योजनेचे लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव, राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव तुम्हाला सहजरित्या मिळू शकेल.
सरकार लाभार्थ्यांची पूर्ण यादी देखील याठिकाणी अपलोड करते. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे हे आधार, बँक डिटेल्स आणि मोबाइल नंबरच्या सहाय्याने माहित करुन घेऊ शकता. तुम्ही मिळणाऱ्या हप्त्याचे स्टेटस देखील अशाप्रकारे जाणून घेऊ शकता. लाभार्थ्यांच्या यादीमध्ये तुमचे नाव नसल्यास याची तक्रार तुम्ही पीएम शेतकरी सन्मान निधी हेल्पलाइनवर करू शकता. 011-24300606 या हेल्पलाइन क्रमांकावर तुम्हाला कॉल करता येईल.