(मुंबई/किशोर गावडे)
घरची परिस्थिती बेताची, कर्जाचा प्रचंड डोंगर आणि अनेक जण घेतलेल्या पैशाचा तगादा लावत असताना हा भार कसा कमी करायचा या विवंचनेत असलेल्या 27 वर्षीय तरूणाने स्वतःच्याच कंपनीचे पैसे लुटण्याचा कट रचला. यासाठी त्याने आपला मित्राला कटात सामील करुन घेतल्याचे वृत्त हाती आले आहे.
शेअर बाजारात गुंतवलेले पैसे बुडाल्याने कर्जबाजारी झालेल्या तरुणाने स्वतःच्या कंपनीचे पैसे लुटण्याचा कट रचला. हा कट प्रत्यक्षात अंमलातही आणला. मात्र पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेने अखेर आरोपीला घेरलेच. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तरुणाची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मुलुंड पोलिसांनी आरोपी तरुणासह त्याला मदत करणाऱ्या त्याच्या मित्राला अटक केली आहे. मुंलुड पोलिसांनी गुन्हा नोंद 540/2022 भांदवी कलम 392, 328 प्रमाणे गुन्हा दाखल केला.
डोंबिवली येथील रहिवासी असलेला हा तरुण मुलुंड येथील मॅरेथॉन चेंबर बिल्डिंग पिके रोड मुलुंड पश्चिम येथील पहिल्या मजल्यावरील सिद्धार्थ बलवंत राय शहा यांचे सिद्धार्थ असोसिएशट हे या नामवंत कार्यालय आहे.
सिद्धार्थ अँड असोसिएट्स या कंपनीत तो कामाला होता. तरूणाने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले होते. मात्र त्याचे पैसे बुडाले. यामुळे तो कर्जबाजारी झाला होता. कर्जाचा भार कसा कमी करायचा या विवंचनेत असलेल्या तरुणाने स्वतःच्याच कंपनीचे पैसे लुटण्याचा कट रचला. यासाठी त्याने आपला मित्राला या कटात सामील करुन घेतले.
तरुणाने विविध भागातून रिकव्हरी केलेली कंपनीची 13 लाख 75 हजाराची रक्कम लुटण्याचे ठरवले. प्लानप्रमाणे तो रोकड घेऊन ऑफिसमध्ये शिरत असतानाच त्यांच्या मित्रांने त्याच्या नाकावर क्लोरोफार्म लावलेला रुमाल लावला. यामुळे तो बेशुद्ध झाला. त्यानंतर मित्रांने त्याच्याकडील रक्कम घेऊन पोबारा केला.
आपल्या नाकावर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने क्लोरोफॉर्मसारखे काही लावून बेशुद्ध केले आणि पैसे लुटून नेल्याचा बनाव तरुणाने रचला. या लुटीच्या प्रकाराबाबत मुलुंड पोलिसांना माहिती देण्यात आली. मुलुंड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत कंपनीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलिसांना संशय आला
सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना तरुणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. डॉक्टरांचा रिपोर्ट आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने पोलिसांनी तरुणाची कसून चौकशी केली. अखेर त्यानेच हा बनाव केल्याचे मान्य केले. त्याच्याकडून माहिती मिळताच पोलिसांनी त्याचा मित्राला रोख रकमेसह 24 तासांच्या आत अटक केली.
या संपूर्ण घटनेचा तपास जलदगतीने व निकाली काढण्यासाठी पोलीस आयुक्त प्रशांत कदम,( परी.मंडळ 7 ) यांनी तातडीने आदेश दिले.सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांतीलाल कोथंबीरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक व अन्य पोलीसांनी या गुन्ह्याचा छडा लावला.