(चिपळूण)
कुळवंशाची कुलस्वामिनी श्री भैरीभवानी मूळपीठ श्रीक्षेत्र शृंगारपुर येथे श्री भैरीभवानी प्रचितगड सेवा संस्थान शृंगारपूर ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी या संस्थानच्या वतीने दरवर्षी भैरीभवानी मंदिरात वैशाख पौर्णिमा उत्सव सोहळा उत्साहाने साजरा केला जातो. यानिमित्त मंदिर प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण करण्यात आली असून यावर्षी सदर उत्सव दि. ४ व ५ मे रोजी शृंगारपूर येथे होणार आहे.
यामध्ये सर्व देवता अभिषेक, षोडशोपचारे पूजा, गणेश पुजन, नांदी श्राध्द, पुण्याहवचन, ब्रम्हांडीमंडळ, देवता स्थापना पूजन, देवी स्थापना, पाठ पठण, ग्रहस्थापना, अनीस्थापना, कुमारिका पूजन, सुवासिनी पूजन, ग्रह यज्ञ हवन, सप्तशती पाठ हवन, पूर्णाहूती आणि अंतिम देवाचा गोंधळ असा कार्यक्रम आहे. देवीच्या गोंधळासाठी २२ जोडप्यांनी आपली नावे नोंदविली आहेत.
महाराष्ट्रासोबतच संपूर्ण भारतातून विविध राज्यातूनही मोठ्या संखेने भाविक या उत्सवाला उपस्थित असतात. याही वर्षी मोठ्या संखेने भाविक उपस्थित राहतील हे लक्षात घेवून दोन्ही दिवस दुपारी महाआरती तसेच दुपारी व रात्री श्रीक्षेत्र शृंगारपूर पीठात येणाऱ्या सर्व भाविकांसाठी कार्यक्रमाप्रित्यर्थ सेवार्थ चहा, अल्पोपहार, भोजन व्यवस्था केलेली आहे. या सर्व भाविकांनी कार्यक्रमास सहकुटुंब मित्रपरिवारासह उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा व उत्सव उत्साहात साजरा करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष दीपक रामचंद्र सुर्वे यांनी श्री भैरीभवानी प्रचितगड सेवा संस्थानच्या वतीने केले आहे.