(वेळणेश्वर / उमेश शिंदे)
गुहागर तालुक्यातील क्षत्रिय मराठा युवा संघटना गुहागर आयोजित मराठा प्रिमियर लीग २०२३ क्रिकेट स्पर्धा शृंगारतळीतील जानवळे फाटा येथील (गोल्डन व्ह्यू मैदानावर )२४ मार्च ते 26 मार्च अशी तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धांना मराठा समाजाचे अनेक दिग्गज नेते, सेलिब्रेटी उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत गुहागर तालुका क्षेत्रीय मराठा युवा संघटनेचे अध्यक्ष अँड. संकेत साळवी यांनी दिली.
या स्पर्धेमध्ये सहभागी २० संघ मालक असून सुमारे साडेतीनशे खेळाडू आपल्या खेळाचा थरार दाखविणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पारितोषिक ५५ हजार ५५५, द्वितीय पारितोषिक ३३ हजार ३३३, तृतीय पारितोषिक ११ हजार, चतुर्थ ७ हजार व प्रत्येकी चषक देऊन सन्मानीत करण्यात येणार आहेत. या स्पर्धेत वैयक्तिक बक्षीसंचाही वर्षा होणार आहे या स्पर्धेचे खास आकर्षण म्हणजे मराठा समाजातील दिग्गज नेते कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे, केशवराव भोसले, आमदार भास्कर जाधव, जिल्ह्यातील सर्व मराठा आमदार, पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य किकेट उपाध्यक्ष रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांना निमंत्रित करण्यात ऐणार आहे. तसेच तालुक्यातील सर्व समाजाचे अध्यक्ष, तसेच गुहागर तालुक्यातील इतर समाजातील उत्कृष्ट खेळाडू यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
क्षत्रिय ज्ञाती मराठा संघटना, गुहागर यांच्या मार्गदर्शनाखाली क्षत्रिय मराठा युवा संघटना गुहागर ही मराठा समाजाच्या सर्व गावातील तरुणांना एकत्र करणे व क्षत्रिय मराठा भवन उभारणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन मराठा प्रिमियर लीगचे पहिल्यांदाच आयोजन केलेले आहे. जिल्ह्यातील अशा स्वरुपाची ही प्रथमच स्पर्धा आहे. मराठा प्रिमियर लीग ही केवळ क्रिकेटची स्पर्धा नसून मराठ्यांचा महामेळा आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने गुहागर तालुक्यातील सर्वदूर पसरलेल्या मराठा समाज बांधवांना एकाच छताखाली आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे अँड. संकेत साळवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
तसेच स्पर्धा ही मराठा समाज्याचि नसुन सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इतर समाजातील दिग्गज व्यक्तींचा तसेच इतर समाजातील कर्तबगार व मोठ्या पदावरती असणाऱ्या व्यक्तींचाही सन्मान यानिमित्ताने मराठा समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेमधून दोन निधी जमा होणार आहे आणि समाजातील दानशूर व्यक्तीकडून बक्षीस रूपात जो निधि संकलन होईल तो सर्व निधी हा मराठा भवन बांधण्यासाठी खर्च केला जाणार आहे.
या पत्रकार परिषदेला क्षेत्रीय मराठा समाजाचे सचिव अमिश कदम, युवा संघटनेचे सचिव निखिल साळवी, उपाध्यक्ष शैलेश पवार, उपाध्यक्ष नंदकुमार खेतले, रोहित विचारे, दिनेश कदम, सुयोग विचारे, सागर देसाई, जय शिर्के, कुणाल देसाई, निमेश मोरे आधी युवा प्रतिनिधी उपस्थित होते.