खेड तालुक्यातील शिव व आष्टी गावांना जाणारा रस्त्याचे काम सुरू करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रत्नागिरी कामगार सरचिटणीस संदिप फडकले आणि शिव गावचे सामाजिक कार्यकर्ते अशोक डफले आंदोलन करणार असा इशारा दिला आहे. खेड तालुक्यातील शीव व आष्टी गावांना जाणारा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सड़क योजनेतुन पास झालेला रस्ता वेळेत का झाला नाही. काम सुरु होऊन तीन वर्षे झाली परंतु ते काम वेळेत पूर्ण झाले नाही. ठेकेदार काम करण्यासाठी दिरंगाई करत आहे. ठेकेदारावर कारवाई करा अन्यथा संदिप फडकले आणि अशोक डफले शीव आणि आष्टी गावातील ग्रामस्थ व कार्यकर्ते यांच्या समवेत आंदोलन छेडणार असल्याचे कळवण्यात आले आहे.
ग्रामस्थांना गावात जाण्यासाठी हा रस्ता एकमेव जाण्याचा मार्ग असुन रस्त्यावर खडी पसरवून ठेऊन ठेकेदार यांनी माणूसकी हद्दपार केली आहे. ग्रामस्थ यांनी वेळोवेळी अधिकारी वर्गाजवळ संपर्क करुण सुद्धा ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारचे ठेकेदार किंवा आधिकारी रस्त्याच्या कामासंदर्भात व्यवस्थित माहीती देत नाही. कामात दिरंगाई तसेच रस्त्यावर खडी पसरवून ठेऊन ग्रामस्थांना जाण्या येण्यासाठी दुसरा मार्ग नाही. खडी पसरवून ठेवणाऱ्या राहुल कंट्रक्शन खेड या ठेकेदारावर कारवाई करा. जर येत्या 10 तारीख पर्यंत रस्त्याचे रस्त्याचे काम पुर्ण झाले नाही तर शिव व आष्टी गावातील ग्रामस्थ यांच्या समवेत आंदोलन करणार असा इशारा मनसे रत्नागिरी कामगार सरचिटणीस संदिप फडकले यांनी दिला आहे.