नवनीत राणा आणि रवि राणा यांनी सकाळी नऊ वाजता मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला होता. मात्र, नऊ वाजताच राणा यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर गर्दी केलेले शिवसैनिक बॅरिकेट्स तोडून इमारतीत घुसले. शिवसैनिकांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत आहे. शुक्रवारी सकाळपासून पोलिसांबरोबरच शिवसैनिकही मातोश्री बाहेर पहारा देत आहेत.