(मुंबई)
राज ठाकरे यांच्या भोंग्याच्या मुद्यावरून गेले अनेक दिवस राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. या प्रकरणात खासदार नवनीत राणा यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर करण्यात येणाऱ्या हनुमान चालीसा वाचन प्रकरणी पोलीस कोठडी देण्यात आली होती. या पोलीस कोठडीदरम्यान अमानवीय वागणूक मिळाल्याचा आरोप केल्यानंतर भाजपने शिवसेनेवर आणखी एकदा टीकास्त्र डागलं आहे.
दरम्यान, बेहरामपाडा दिसत नाही आणि शाहीन बागवर कारवाई केल्यावर आरडाओरड करता. राणे, राणा, कंबोज, रनौत दिसतात पण शेख, पठाण दिसत नाहीत. ते अनधिकृत नाहीत असं म्हणायचं आहे का? आम्ही कोणाच्या विरोधात नाही पण अनधिकृत बांधकामावरील कारवाई आडनाव बघून केली जाते, अशी जहरी टीका आशिष शेलारांनी केली आहे.