(मुंबई)
शिवसेनेचं पक्षचिन्ह निवडणूक आयोगानं गोठवल्यानंतर आता त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. तर मनसे चे नेते संदीप देशपांडे यांहीनी ट्विटरवर ट्वीट करत उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. मात्र यावर आता कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
‘संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही. म्हणणाऱ्यांचं नावही संपलं आणि चिन्हही’, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर ट्वीट करत उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे. मनसेच्या अन्य काही नेत्यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून ठाकरे गटावर टीकास्त्र सोडलं होतं. मात्र यावर आता कोणतीही प्रतिक्रिया न देण्याच्या सक्त सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरेयांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी, कुठल्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये.
मी योग्य वेळेस पक्षाची ह्या सगळ्यावर भूमिका मांडेन.— Raj Thackeray (@RajThackeray) October 9, 2022
निवडणूक आयोगाच्या यादीत ठराविक चिन्हे असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या आयोगाकडे एकूण १९७ चिन्हे उपलब्ध आहेत. यातूनच दोन्ही गटांना आपापली चिन्हे निवडण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. त्यामुळे दोन्ही गटांना आपल्या पसंदीची चिन्हे मिळतात का? याची राज्यातील जनतेला उत्सुकता लागली आहे.