( लांजा )
शिवसेना (ठाकरे गट) ग्राहक संरक्षण कक्षाच्या जिल्हा संघटकपदी दत्तात्रय कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष, खासदार शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे. तर रत्नागिरी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हा समन्वयकपदी मुंबईतील सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते संदिप जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हा संघटक दत्तात्रय कदम हे शिवसेनेचे जुनेजाणते निष्ठावान शिवसैनिक आहेत. त्यांनी जिल्हा शिवसेनेचे नेतृत्व केलेले असून जिल्हापरिषद पदाधिकारी म्हणून अनेक वर्षे काम पाहिले आहे. त्यांच्या निवडीनंतर त्यांनी शिवसेना नेते अनंत गीते, सचिव खासदार विनायक राऊत यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले. यासोबतच शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे सरचिटणीस विजय मालवणकर, सचिव निलेश सावंत, खजिनदार देविदास माडये, राज्य कार्यकारिणी सदस्य बबन सकपाळ, अशोक शेंडे आदींनी अभिनंदन केले. दत्ता कदम यांच्या निवडीनंतर त्यांच्यावर जिल्हाभरातून अभिनंदन वर्षाव होत आहे.
फोटो : शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांची भेट घेऊन शुभेच्छा घेताना दत्ता कदम सोबत अन्य मान्यवर.