(मुंबई/ प्रतिनिधी)
शिंदे यांनी तब्बल ३५ पेक्षा अधिक शिवसेनेचे आमदार फोडल्यानं आता ठाकरे सरकार कोसळणार ही शक्यता दाट झाली आहे. एकनाथ शिंदे यांची आवश्यक असलेल्या आमदारांची बेरीज जवळपास जुळली असल्याचं दिसत असून आता मुख्यमंत्री काय करणार याकडेच महाराष्ट्राच लक्ष लागलं आहे.
या सर्व घडामोडीत शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसैनिकांनी माहीमचे आमदार सदा सरवणकर यांच्या बॅनरवरील फोटोला काळे फासले आहे. इशारा ही दिलाय की, मुंबईत परत आला तर पुन्हा तोंडाला काळे फासले जाईल.