गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना दतियामधून उमेदवारी देण्यता आली. नऊ मंत्र्यांच्या मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा भाजपाने अद्याप केली नाही. त्यामुळे या मंत्र्यांना उमेदवारी मिळेल की, त्यांच्या मतदारसंघात भाजपा नवीन उमेदवार देईल याकडे लक्ष लागले आहे.
वरिष्ठ मंत्री यशोधरा राजे शिंंदे यांनी यावेळी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे. विधानसभा अध्यक्ष गिरीश गौतम यांना त्यांच्या देवतालाब मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. माजी विधानसभा अध्यक्ष डॉ. सीतासरन शर्मा यांची उमेदवारी अद्याप जाहीर झाली नाही. होशंगाबादमधून उमेदवारी मिळेल, अशी त्यांची अपेक्षा आहे. भाजपाने आपल्या पहिल्या दोन याद्यांत प्रत्येकी 39 उमेदवारांची घोषणा केली होती. तिसर्या यादीत फक्त एका उमेदवाराचे नाव होते. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपाने आपल्या 79 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती.
मध्यप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने तीन केंद्रीय मंत्र्यासह सात खासदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर, प्रल्हादसिंह पटेल आणि फग्गनसिंह कुलस्ते यांनाही भाजपाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांना भाजपाने इंदूर एकमधून उमेदवारी दिली आहे.