(निवोशी/गुहागर – उदय दणदणे)
मुबंई शहरातून बहुतांश कोकणी चाकरमानी आता मुबंई उपनगरात स्थिरावत असल्यामुळे दिवा, विरार, नालासोपारा, वसई, डोंबिवली, बदलापूर सारख्या ठिकाणी राहणाऱ्या चाकरमानी यांना कोकणच्या लोककला सादर होत असलेल्या मुबंईतील नाट्यगृहात इच्छा असूनही वेळ आणि आर्थिक या दोन्ही बाजूंनी विचार करता त्यांना उपस्थित राहता येत नाही.
कोकणी लोककला हे आपलं अस्तित्व, संस्कृती, आणि धावपळीच्या जीवनात थोडासा का होईना मनोरंजन माणसाला तणावमुक्त जगण्याची उमेद देते आणि म्हणूनच मुबंई उपनगरात राहणाऱ्या कोकणातील चाकरमान्यांसाठी शिवरत्न प्रोडक्शन निर्मित व सखे शेजारी ग्रुप मुंबई आयोजक सुभाष बांबरकर, कवी- शाहिर रमाकांत जावळे, विजय साळवी,जय साळवी, चेतन साळवी, महेंद्र जावळे, अंकुश मुकनाक, प्रकाश मांडवकर, सोनल साखरे, सुशीला जावळे, वृषाली गिध, आणि शाहिर-चंद्रकांत साळवी यांच्या सहकार्याने जाखडीनृत्य शक्ती -तुरा जंगी सामना शक्तीवाले शाहिर प्रसाद शिरकर (गुहागर) व तुरेवाले शाहिर तुषार पंदेरे (संगमेश्वर) अशा सुप्रसिद्ध शाहिरांच्या सादरीकरणात शनिवार दिनांक ३० जुलै २०२२ रोजी रात्रौ.०७.३० वा .साई छाया विद्यामंदिर, वीर जिजाई नगर , मोरेगाव -नालासोपारा (पूर्व) येथे हा जुगलबंदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती साठी- सुभाष बांबरकर- ९८९२३८४४७१ रमाकांत जावळे-९७०२३३३८६३ अंकुश मुकनाक -९९६७५०७९९० यांच्या कडे संपर्क साधावा. तरी जास्तीत जास्त रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.