(जीवन साधना)
देवांचे देव महादेव अत्यंत भोळे असून कोणत्याही भक्ताने भक्तिभावाने त्यांना केवळ पाणी अर्पण केले तरी ते प्रसन्न होतात. यामुळेच यांना भोलेनाथ संबोधले जाते. श्रावण महिन्यात शिव भक्त महादेवाला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतात. असेच काही छोटे आणि सोपे उपाय शिवपुराणात सांगण्यात आले आहेत. हे उपाय अगदी सोपे असून सहजतेने केले जाऊ शकतात. प्रत्येक समस्येचे समाधान शिवपुराणात सांगण्यात आले आहे. श्रावणात हे उपाय केल्यास भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.
शिवपुराणानुसार महादेवाला प्रसन्न करण्याचे उपाय या प्रकारे आहेत –
- महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धन प्राप्ती होते.
- तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो.
- जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते.
- गहू अर्पण केल्याने आपत्य वृद्धी होते
शिवपुराणानुसार महादेवाला कोणत्या रसाने (द्रव्य) ने अभिषेक केल्याने कोणते चांगले फळ प्राप्त होते –
- ताप (ज्वर) आला असेल तर महादेवाला जल अर्पण केल्याने लवकर फरक पडेल. सुख आणि आपत्य वृद्धीसाठीसुद्धा महादेवाला जलाभिषेक करणे उत्तम मानण्यात आले आहे.
- तलख्ख बुद्धीसाठी साखर मिश्रित दुध महादेवाला अर्पण करावे.
- शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केल्याने सर्व आनंदाची प्राप्ती होते.
- महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो.
- मधाने महादेवाचा अभिषेक केल्यास टीबी रोगातून आराम मिळतो.
- जर शारीरिक रुपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गायीच्या शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करावा. या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते.
शिवपुराणानुसार महादेवाला कोणते फुल अर्पण केल्याने कोणते फळ प्राप्त होते –
- लाल व पांढऱ्या रुइचे फुल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होऊ शकतो.
- चमेलीचे फुल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते.
- शमी वृक्षाचे पान अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो
- बेलाचे फुल आणि पान अर्पण केल्याने सुंदर आणि सुशील पत्नी मिळू शकते
- जाई-जुइचे फुल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही.
- कन्हेरीचे फुल अर्पण केल्याने नवीन वस्त्र प्राप्त होतात.
- प्राजक्तांच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास सुख-संपत्तीमध्ये वृद्धी होते
- धोतार्याचे फुल अर्पण केल्याने महादेव सुयोग्य पुत्र प्रदान करतात, जो कुळाचा उद्धार करतो.
- दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आयुष्य वाढते.
श्रावण महिन्यात महादेवाला प्रसन्न करणारे इतर उपाय –
- श्रावणात दररोज बेलाच्या 12 पानांवर ऊं नम: शिवाय लिहून, ही पाने शिवलिंगावर अर्पण करा. या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.
- तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी घरामध्ये गोमुत्र शिंपडावे.
- लग्न जमण्यात अडचणी येत असेतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दुध अर्पण करा. या उपायाने लवकरच लग्नाचे योग जुळून येऊ शकतात.
- श्रावणात दररोज नंदी (बैल)ला हिरवा चारा टाका.
- श्रावणात गरिबांना अन्नदान करा. या उपायाने तुमच्या घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता राहणार नाही तसेच पितरांच्या आत्म्याला शांती मिळेल.
- श्रावण महिन्यात दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करून काळे तीळ अर्पण करावेत. त्यानंतर मंदिरात बसूनच ऊं नम: शिवाय मंत्राचा यथाशक्ती जप करावा. या उपायाने मानसिक शांती लाभेल.
- श्रावणात एखाद्या नदी किंवा तलावातील माशांना पिठाच्या गोळ्या तयार करून खाऊ घालाव्यात. हा धन प्राप्तीचा सोपा उपाय आहे.
उत्पन्न वाढवण्यासाठी –
श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी घरामध्ये पारद शिवलिंगाची स्थापना करून त्याची विधिव्रत पूजा करावी. त्यानंतर खालील मंत्राचा 108 वेळेस जप करावा.ऐं ह्रीं श्रीं ऊं नम: शिवाय: श्रीं ह्रीं ऐंप्रत्येक मंत्रोच्चारासोबत पारद शिवलिंगावर एक बेलाचे पान अर्पण करावे. बिल्वपत्राच्या तीन पानांवर क्रमशः ऐं, ह्री, श्रीं लिहावे. शेवटचे 108 वे बेलाचे पान शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर काढून घ्यावे आणि देवघरात ठेवावे. दररोज या पानाची पूजा करावी. हा उपाय केल्याने उत्पनात वाढ होऊ शकते असे मानले जाते.
आपत्य प्राप्तीसाठी –
श्रावणात कोणत्याही दिवशी सकाळी लवकर उठून महादेवाची पूजा करावी. त्यानंतर गव्ह्याच्या पीठाचे 11 शिवलिंग तयार करावेत. त्यानंतर प्रत्येक शिवलिंगावर शिव महिम्न स्तोत्राचा उच्चार करीत जलाभिषेक करावा. अशाप्रकारे 11 जलाभिषेक करावेत. अभिषेक केलेल्या पाण्याचा काही भाग प्रसाद रुपात ग्रहण करावा. हा उपाय नियमितपणे 21 दिवस करावा. या उपायाने आपत्य प्राप्तीमध्ये येणारे अडथळे दूर होऊ शकतात.
व्याधीमुक्त होण्यासाठी खास उपाय –
श्रावण महिन्यात सोमवारी पाण्यामध्ये दुध आणि काळे तीळ टाकून शिवलिंगावर अभिषेक करावा. अभिषेक करताना “ऊं जूं स:” मंत्राचा जप करावा. त्यानंतर महादेवाकडे रोग निरावरणासाठी प्रार्थना करावी. या उपायाने आजार बरा होण्यास मदत होईल.