( मुंबई/किशोर गावडे )
शिवतीर्थावर शिवसेनेचाच दसरा मेळावा होणारच, मनात कोणताही संभ्रम ठेवू नका. महिला आघाडी, युवा सेना, शिवसैनिकांना सोबत घ्या, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ते आज ( दि.17) शिवसेना भवनात आयोजित विभाग प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांसह प्रमुख पदाधिकार्यांच्या बैठकीत बोलत होते. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या तयारी संदर्भात नेत्यांना महत्त्वाच्या सूचना करत आदेश दिले.
शिंदे गट आणि भाजपाने शिवसेनेची परंपरा असलेल्या दसरा मेळाव्याबाबत संभ्रम निर्माण केला होता. दसरा मेळावा आम्हीच घेणार असे म्हणत शिंदे गटाने थेट प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आव्हान देत दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेल्या परंपरेलाच हात घातला होता. यावरून दोन्हीकडील नेते परस्परविरोधी दावे करत होते.
मात्र, आता उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर शिवसेनेचाच दसरा मेळावा होणार, असे म्हणत नेते आणि शिवसैनिकांना तातडीने कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.