( मुंबई )
साई भक्तीचा महिमा हा अजरामर आहे, साईबाबांची विलक्षण अनुभूती ही भाविकांना येत असते. त्याच अनुभूतीतून हैदराबाद येथील एका भाविकांने आपल्या स्वर्गीवासी पत्नीची इच्छापूर्ती करण्यासाठी साई चरणी सुमारे 33 लाख रुपये किमतीचा तब्बल ७०७ ग्रॅम हिरेजडित सुवर्ण मुकुट अर्पण केला आहे.हैदराबाद येथील मंडा रामकृष्ण यांनी हा रत्नजडीत सुवर्ण मुकुट
साई चरणी अर्पण केला. साई संस्थानच्या वतीने हे दान मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी स्वीकारले. साईबाबांना शुक्रवारी दान स्वरुपात मिळालेला हा मुकूट अतिशय आकर्षक आहे. मुकुटावर रत्नांचा साज चढवण्यात आला आहे, ओम या नावाची छबी रेखाटण्यात आली आहे. तर मुकूटाच्या वरच्या भागाला मोरपिसाने सजवण्यात आलं आहे. हा मुकूट दानशूर भाविकाच्या इच्छेनुसार आज माध्यान्ह आरतीदरम्यान मूर्तीवर चढवण्यात आला.