(रत्नागिरी/प्रतिनिधी)
मुस्लीम मोहल्ला शिरगाव, रत्नागिरी येथे पत्नीने पतीला मारहाण केल्याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवार 17 एप्रिल रोजी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फैयाज मुजावर (47, मुस्लीम मोहल्ला, शिरगाव) यांनी आपला मुलगा झैन हा घरी आला असता त्याला ‘तू दीड महिना जिथे रहात होतास तिथेच रहायचे इकडे कशाला आलास‘ असे सांगितल्याचा राग येउन फैयाज यांची पत्नी परवीन फैयाज मुजावर हिने शिवीगाळ करत घरातील लाकडी फळीचा तुकडा फिर्यादी फैयाज यांच्या डोक्यात मारुन जखमी केले. तसेच ठार मारुन टाकीन अशी धमकी दिली.
फैयाज मुजावर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पत्नी परवीन मुजावर हिच्यावर भादविकलम 324, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.