( रत्नागिरी / प्रतिनिधी )
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवात निमित्त चिमुकल्यापासून थोरामोठ्यांपर्यंत गावातील प्रत्येक नागरिकांमध्ये देशाविषयी अभिमान जागृत ठेवण्यासाठी तालुक्यातील शिरगाव आडी येथे हर घर तिरंगा रॅली काढण्यात आली.
आडी मराठी शाळा व आडी अंगणवाडी क्रमांक 25, बीट कोतवडे 1 यांच्यातर्फे एकत्रितपणे अमृत महोत्सवा निमित्ताने प्रभात फेरी काढण्यात आली. या फेरी मध्ये चिमुकल्यांनी उत्साहात सहभाग घेतला होता. ‘तिरंगा आहे आमची शान, मेरा भारत देश महान’, अशा देश भक्तीच्या घोषणा देत गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. प्रत्येक मूल, महिला अंगणवाडी सेविका, शिक्षक यांनी तिरंगा हातात घेऊन उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
या प्रभात फेरीत आडी मराठी शाळेचे सर्व शिक्षक, आडी शाळेच्या मुख्याध्यापिका, आडी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्ती, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, माजी ग्रामपंचायत सदस्य , 2 ते 6 वयोगटातील विद्यार्थी, इ. 1 ली ते इ 7 वी सर्व विद्यार्थी, माता पालक, ग्रामस्थ व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.