चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथे लिबर्टी एकता युवा मंच व एस ए फिटनेस जिमच्या आयोजित रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी आ. शेखर निकम व इ. कॉ. तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी शिरगाव सारख्या ग्रामीण भागात शिबिराचे आयोजन केल्याबद्दल लिबर्टी एकता युवा मंच व एस ए फिटनेस यांना शुभेच्छा दिल्या.
या शिबिराला आ. शेखर निकम, इ. कॉ. तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, जेष्ठ नेते दादा साळवी, आर. पी. आय नेते राजू जाधव ,प. स. सदस्य बाबू साळवी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष जयंत खताते, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष जागृती शिंदे, सरपंच अनिल शिंदे, शिरगाव सोसायटी चेअरमन भाई शिंदे, इ. कॉ. माजी तालुकाध्यक्ष भरत लब्ध्ये, माजी तंटामुक्त अद्यक्ष जयंतराव शिंदे, ग्रामपंचायत सदस्य समीर धागडे, संतोष नाचरे, विक्रम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी शिबिराचे उदघाटन आ. शेखर निकम यांच्या हस्ते झाले तर शिबिरात शिरगाव परिसरातील 30 जणांनी रक्तदान केले यामध्ये महिलांनी सुध्दा रक्तादान केले त्यामुळे शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी रक्तदान शिबिराला राष्ट्रवादी तालुकादयश जयंत खताते यांनी आरोग्य किट भेट स्वरूपात दिले
शिबीर यशस्वीरित्या पार पडण्यासाठी लिबर्टी एकता युवा मंच व एस ए फिटनेस, शिरगाव ग्रामपंचायत व डेरवण वालावलकर रुग्णालयातील रवी अगरवाल आणि टीम त्याचबरोबर निसार शेख , बंटी कोलगे, समीर आंबेकर, विक्रम शिंदे, तेजस गांवनग, अमीर कूटरेकर, ओंकार देवळेकर, ओंकार जाधव, प्रविण माने, सर्वेश जाधव, रफिक शिकलगार, साहिल शेख , महेश जाधव, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अथक प्रयत्न केले सूत्रसंचालन व मार्गदर्शन डॉ विशाल पेटकर यांनी केले .