(मुंबई)
राज्यातील पाच शिक्षक-पदवीधर मतदारसंघात सोमवारी झालेल्या निवडणूकीत सरासरी ७२.४४ टक्के मतदान झाले. राज्यात कोकण विभागातल्या सर्वाधिक ९१ टक्के तर नाशिक विभागात सर्वांत कमी ४९.२८ टक्के मतदान झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.
दोन पदवीधर व तीन शिक्षक मतदारसंघातील द्विवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली. यामध्ये नाशिक विभाग (४९.२८ टक्के), अमरावती विभाग (४९.६७ टक्के), औरंगाबाद विभाग (८६ टक्के), नागपूर विभाग (८६.२३ टक्के), कोकण विभाग (९१.०२ टक्के) मतदान झाले.
दोन पदवीधर व तीन शिक्षक मतदारसंघातील द्विवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली.नाशिक विभाग (४९.२८ टक्के), अमरावती विभाग (४९.६७ टक्के),औरंगाबाद विभाग (८६ टक्के), नागपूर विभाग (८६.२३ टक्के),कोकण विभाग (९१.०२ टक्के) मतदान झाले- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे pic.twitter.com/RoKini39TQ
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 30, 2023