(संगलट/ इक्बाल जमादार)
रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पतपेढीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली. या निवडणूकीत महायुतीचे दापोली तालुका उमेद्वार जि.प.शाळा ब्राह्मणवाडीचे मुख्याध्यापक अशोक तुकाराम मळेकर यांनी ३७१मते मिळवून २२२ ची आघाडी घेत दापोलीचा गड कायम राखला.
मळेकर यांच्या विजयासाठी अखिल भारतीय शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती,उर्दू शिक्षक संघटना,पदवीधर शिक्षक संघटना आदिंचे योगदान लाभले. शिक्षक नेते रमाकांत शिगवण,प्रविण काटकर,विजय फंड,समिती तालुकाध्यक्ष दिलीप मोहिते,अंकुश गोफणे, विश्वास भोपे,स्वप्नील परकाळे, भालचंद्र घुले,अर्जून कांबळे, मुग्धा सरदेसाई, मानसी सावंत आदि महिला आघाडी यांनी प्रचारात विशेष आघाडी घेत विजयश्री खेचून आणली. या विजयाबद्दल सर्वत्र मळेकर यांचे अभिनंदन होत आहे.
अखिल शिक्षक संघटनेने विजयाची हॅट्रिक करत दापोलीत आपले वर्चस्व असल्याचे सिध्द केल्याचे दिसून आले हा आपला विजय नसून महायुतीमधील प्रत्येक व्यक्तीचा असून तो मी आपणास समर्पित करत असल्याचे सांगत, संचालक पदाच्या कार्यकालात अपण सर्व सभासदांचे हित जोपासून पारदर्शकतेने कारभार करु अशी ग्वाही नुतन संचालक मळेकर यांनी दिली.