(चिपळूण)
शिक्षक ध्येय, ज्ञान संवाद, संत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्था, हिंगणघाट जि. वर्धा, तसेच नागपूर विभाग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था, चंद्रपूर, यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यातील शिक्षकांसाठी कर्तुत्ववान शिक्षक पुरस्कारासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात प्राथमिक गट व माध्यमिक तसेच महाविद्यालयीन गट या गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये राज्यातील 39 शिक्षकांची निवड करण्यात आली. यात न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज खेर्डी चिंचघरी सती ता.चिपळूण या विद्यालयातील तंत्रस्नेही शिक्षक श्री योगेश नाचणकर यांची माध्यमिक गटातून निवड करण्यात आली आहे.
या नवोपक्रम स्पर्धेत नाचणकर यांनी स्वमत मांडा लेखक व्हा! हा नावीन्यपूर्ण उपक्रम सादर केला. विद्यार्थ्यांच्या अध्ययनात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यांच्यातील कौशल्य विकसित व्हावी या उद्देशाने हा उपक्रम ते घेत आहेत. यापूर्वीही योगेश नाचणकर यांना डिजिटल शिक्षणातून आनंददायी शिक्षण या उपक्रमाला देखील पुरस्कार मिळाला आहे.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब भुवड, कार्याध्यक्ष मा. श्री शेखर निकम, सेक्रेटरी श्री. महाडिक, संचालक- श्री खानविलकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक वरेकर, उपमुख्याध्यापक श्री दाभोळकर, पर्यवेक्षक श्री काळुगडे, पर्यवेक्षिका सौ राजेशिर्के मॅडम यांनी अभिनंदन केले.