( मुंबई )
विधानसभेत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलाचं धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. यानंतर भाजप नेत्यानं मोठा गौप्यस्फोट केल्याचे समोर आले आहे. भास्कर जाधव यांनी शिंदे गटात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 100 वेळा फोन केला. हा फोन भास्कर जाधव यांनी २२ जूनला केला होता, यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांना फोन करून बंडखोर आमदारांमध्ये सामील करून घेण्याची विनंती केली, असा मोठा दावा भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. मात्र भास्कर जाधव यांच्यावर विश्वास ठेवणं योग्य नसल्याने त्यांना गटात घेण्यात आलं नाही असंही ते म्हणाले.
भास्कर जाधव यांनी शिंदे गटामध्ये सामील होण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिलं होतं. पण भास्कर जाधवांवर विश्वास ठेवता येणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना या आमदारांच्या गटात घेतलं नाही, असेही मोहित कंबोज यांनी म्हटले आहे. भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी एक ट्वीट केलं असून त्यामध्ये त्यांनी हा आरोप केला आहे. कंबोज यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 100 वेळा फोन केला आणि 22 जून रोजी बंडखोर आमदार गटात सामील करण्याची विनंती केली. भास्कर जाधव यांच्यावर विश्वास ठेवण्यास योग्य नसल्यामुळे त्यांना गटात घेण्यास एकनाथ शिंदेजी नाखूष होते. भास्कर जाधव यांनी गुवाहाटीचे तिकिटही बूक केले. भास्कर जाधव हे सत्य नाकारू शकतात का?”
Bhaskar Jadhav Called 100 Times To CM Eknath Shinde ji & Begged to Join The Rebel MLA Group In June 22 .
Shinde Ji Was Reluctant to Take Jadhav In The Group As he Is Not Trust Worthy !
Jadhav Even Booked Ticket to Guwahati .
Can Jadhav Deny This Fact ?@_BhaskarJadhav— Mohit Kamboj Bharatiya ( Modi Ka Parivar ) (@mohitbharatiya_) February 27, 2023
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्यापासून भास्कर जाधवांनी भाजपवर टीका करायची एकही संधी सोडली नव्हती. राज्यात सत्तांतर झालं आणि भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावरही भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर तुफान हल्ला चढवत नामोहरम केले होते. त्यामुळेच शिवसेना ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते भास्कर जाधव हे सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर असल्याचे बोलले जात आहे.