शाहीन बाग 28 एप्रिल रोजी तब्बल 400 कोटींची ड्रग्स पकडल्यानंतर काल उशिरा पुन्हा एकदा दिल्लीत तब्बल 434 कोटी रुपयांचा हेरॉईनचा साठा जप्त करण्यात आला आहे. 28 एप्रिलला सापडलेल्या ड्रग्स नंतरची दिल्लीतली ही सर्वात मोठी कारवाई आहे. केंद्रीय महसूल खात्याच्या गुप्तचर विभागाने ही कारवाई केली असून परदेशातून कार्गो विमानाने हा साठा दिल्लीत पोहोचला होता. एकूण 54 किलो एवढा हिरॉईनचा साठा जप्त केला असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत 434 कोटी रुपयांची आहे.
कार्गो एअर मधून कुरियरने हे हेरॉईन पोचणार असल्याची गुप्त माहिती महसूल विभागाच्या गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. या माहितीवर आधारित गुप्तचर यंत्रणांनी अलर्ट राहून कारवाई केली. यात 54 किलो हेरॉईनचा साठा जप्त करण्यात आला.
सीएए विरोधातील आंदोलनात चर्चेत आलेली शाहीनबाग आता ड्रग्स माफियांचा अड्डा असल्याचे स्पष्ट झाले. ११ डिसेंबर २०१९ ते २४ मार्च २०२० या कालावधीत दिल्लीतील मुस्लिम समाजातील शेकडो कुटुंबांनी शाहीन बाग रस्त्यावर बेमुदत ठिय्या मांडला होता. सीएए कायद्याच्या विरोधात मुस्लिमांनी हे आंदोलन केले होते. केंद्र सरकारला अडचणीत आणण्यासाठी या भागाचा राजकीय वापर केला, आज तोच भाग पुन्हा चर्चेत आला आहे. या ठिकाणी 50 किलो ड्रग्ज आणि 30 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती.
या भागातून नोटा मोजण्याची मशीनदेखील हस्तगत करण्यात आली होती. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्सची किंमत सुमारे 400 कोटी रुपये होती. जप्त करण्यात आलेले ड्रग्ज अफगाणिस्तानातून आणण्यात आले होते तर ते हेरॉईन फ्लिपकार्टच्या पॅकिंगमध्ये बंद करण्यात आले होते. इंडो-अफगाण सिंडिकेटच्या माध्यमातून अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री सुरू होती, अशी माहिती सांगण्यात आली.
या सिंडिकेटचे धागेदोरे उत्तर प्रदेश, पंजाबपर्यंत जात असल्याचे समजते. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. दिल्लीतील शाहीन बाग आणि जामिया परिसरात छापे टाकण्यात आले. ड्रग्ज तस्करीच्या एका मोठ्या सिंडिकेटचा पर्दाफाश करण्यात एनसीबीला यश आले. या सिंडिकेटमध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतीय व्यक्तींचा समावेश आहे.