(वास्तू)
महाभारतामध्ये युधिष्ठीरने श्रीकृष्णाला विचारले की, घरामध्ये सुख-समृद्धी कायम ठेवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तेव्हा श्रीकृष्णाने युधिष्ठीरला अनेक गोष्टी सांगितल्या, त्यामधील काही निवडक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत आहोत. या गोष्टी कायम घरात असल्याचे लक्ष दिल्यास सुख-समृद्धी कधीही नष्ट होणार नाही असे मानले जाते.
1. चंदन – चंदनाला अत्यंत पवित्र मानण्यात आले आहे. याच्या सुगंधाने वातावरणातील नकारात्मक उर्जा नष्ट होते. सर्व देवी-देवतांच्या पूजेमध्येसुद्धा चंदनाचे विशेष महत्त्व आहे. चंदनाचा टिळा लावला जातो. हा टिळा लावल्याने मनाला शांती मिळते. चंदन घरात अवश्य ठेवावे, कारण दररोज पूजा करताना देवतांना चंदन अर्पण करणे आवश्यक आहे.
2. वीणा – बुद्धी आणि विद्येची देवी सरस्वतीचे प्रिय वाद्य वीणा आहे. वीणा घरामध्ये ठेवल्यास सरस्वतीच्या कृपेने सर्व सदस्यांचा बुद्धीचा विकास होईल. कठीण काळातही धैर्य बाळगण्याची प्रेरणा मिळेल.
3. शुद्ध तूप – तूप घरामध्ये शुद्ध तूप नेहमी ठेवावे आणि नियमितपणे याचे सेवन करावे. तुपामुळे शक्ती मिळते आणि शरीर निरोगी राहते. दररोज संध्याकाळी घरामध्ये तुपाचा दिवा लावावा. पूजेमध्येही तुपाचे विशेष महत्त्व आहे. या कारणामुळे घरात तुप असणे आवश्यक आहे.
4. मध – वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मध ठेवल्याने वास्तूचे विविध दोष शांत होतात तसेच पूजेमध्ये मध आवश्यक आहे. मध सर्व देवी-देवतांना अर्पण केला जातो. ज्या घरामध्ये नियमितपणे पूजा केली जाते, तेथे मध असणे आवश्यक आहे.