(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील विविध शासकीय विभागाचे अनागोंदी कारभाराबाबत जिल्हाधिकारी यांना पंचायत समिती देवरूख यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात केलेल्या कसूरबाबत, जलजीवन मधील भ्रष्टाचार व निकृष्टदर्जाचे काम, जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या व सार्वजनिक बांधकाम उप विभाग देवरूख द्वारा ताम्हाणे बौद्धवाडी येथील पुलाचे व रस्त्यांच्या निकृष्टदर्जाचे कामांबाबत सखोल चौकशी करणे बाबत, व इतर अनेक विषयांबाबत तसेच गटविकास अधिकारी यांनी अनेक तक्रार अर्जांवर कोणतीही कार्यवाही न केल्याने कर्तव्यात कसूर केल्याबद्दल कार्यवाही करणेबाबत निवेदन देण्यात आले.
यावर कोणतीही योग्य कार्यवाही न केल्यास दिनांक 15 ऑगस्ट 23 रोजी उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. असे माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ मुंबईचे संगमेश्वर तालुका अध्यक्ष मनोहर गुरव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे. यावेळी श्री एकनाथ मोहिते, श्री हरिश्चंद्र गुरव, विजय साळुंखे, संजय टक्के,उपस्थित होते. तसेच अनिल सागवेकर, प्रमोद रेवणे, शिवाजी व्हालकर यांनी याकामी सहकार्य केले.