देवरुख दि . १७ ( प्रतिनिधी ) :- साखरपा भागातील कोंडगाव, भडकंबा, किरबेट, देवडे, मुर्शि,चोरवणे, घाटीवळे,देवळे ह्या ग्रामपंचायतीना शासकीय योजना प्रत्येक ग्रामपंचायती पर्यंत पोहचल्या पाहिजेत यासाठी सभापती जयसिंग माने यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत भेटी देऊन आढावा बैठका घेतल्या आणि ग्रामस्थांना योजनांची माहिती दिली.
यावेळी जलजीवनमिशन , मनरेगा,कृषी या खात्याचे अधिकारी सोबत होते. ग्रामीण पाणीपुरवठाचे इंदुलकर , पवार,कृषी विभागाचे शिवगण आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व ग्रामपंचायतीचा आराखडा बनविण्यात आला.
जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचले पाहिजे यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे तसेच कृषी विषयक योजना नागरिकांपर्यंत पोहचल्या पाहिजे यासाठी अधिकाऱ्यांनी मेहनत घेतली पाहिजे असे सांगितले.मनरेगा योजना अंतर्गत गावातल्या लोकांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सभापती जया माने यांनी सांगितले. या अंतर्गत २६० योजनांची माहिती ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामसेवकांद्वारे लोकांपर्यंत पोचली पाहिजे याकडे बारकाईने लक्ष देणार असल्याचे सांगितले.यामुळे उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांनी व पदाधिकारी यांचे आभार मानले.
या आढावा बैठकीवेळी जिल्हा परिषद सदस्या रजनी चिंगळे मॅडम, काका कोलते,अजय सावंत ,शेखर आकटे, मंगेश दळवी,रवी कमेरकर, रावजीधुमक,सचिनअंकुशराव,साखरपा सरपंच विनायक गोवरे, उपसरपंच पाटोळे, कोंडगाव सरपंच बापू शेट्ये, उपसरपंच प्रवीण जोयशी, भडकंबा सरपंच सौ. नवले मॅडम, उपसरपंच बापू शिंदे, किरबेट सरपंच सौ.निंबाळकर मॅडम,उपसरपंच प्रशांत अडबल, देव डे सरपंच राणे , देवळे उपसरपंच, घाटीवळे सरपंच सौ.कदम,उपसरपंच लक्ष्मण शिंदे, चोरवणे सरपंच दिनेश कांबळे, उपसरपंच बसवणकर आदी पदाधिकारी , सदस्य उपस्थित होते.सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले.