(वैभव पवार / गणपतीपुळे)
रत्नागिरी शासकीय अध्यापक महाविद्यालय येथे दि. 8 ते 13 जानेवारी 2024 या कालावधीत महाविद्यालयातील द्वितीय वर्ष बी.एड. मुंबई विद्यापीठ, अभ्यासक्रमांतर्गत प्रथम सत्राच्या विद्यार्थ्यांकरीता प्रात्यक्षिक कार्य पूर्ततेच्या हेतूने समाजसेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
दि. 8 ते 10 जानेवारी 2024 या कालावधीत प्रशिक्षणार्थ्यांनी महाविद्यालयांतर्गत स्वच्छतेचे कामकाज केले. तर उर्वरित दिवसांकरिता झरेवाडी, ता. रत्नागिरी येथे श्रमदान केले. सदर कालावधीत जिल्हा परिषद शाळा झरेवाडी येथे शाळेच्या प्रांगणात श्रमदान केले, तसेच झरेवाडी येथील नदी प्रवाहात बंधारा घालून श्रमदान केले. त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्रशिक्षणार्थी व शालेय विद्यार्थी यांनी मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले व सदर शिबिराची सांगता झाली.
या शिबिराकरिता प्राचार्य डॉ. देशपांडे राजश्री व महाविद्यालय प्राध्यापक वर्ग डॉ. कांबळे, डॉ.मजगावकर श्री.पंकज सुर्वे आदी उपस्थित होते. तसेच संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिका,शाळेच्या तील शिक्षकवर्ग, गावकार, कोतवाल, श्री.कळंबटे आदी ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शविली. तसेच प्रशिक्षणार्थींच्या श्रमाचे कौतुकही केले. याकरिता विशेष सहकार्य अँड. श्री. अवधूत कळंबटे यांचे लाभले.या सर्वांना महाविद्यालयाच्या वतीने सर्वांना धन्यवाद देण्यात आले.