(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील शाळा रानपाट येथील विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा केला. इयत्ता पहिलीतील विद्यार्थी कृष्णा आणि राधाची वेशभूषा करून छान सजले होते. या वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रसंगी मुलींनी दहीकाला गीतांवर दांडिया रास सादर केला. मुलानी गोविंदा पथकांप्रमाणे उत्सवाचा मनमुराद आनंद करत दहीहंडी फोडण्यात आली.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने नृत्य आणि वेशभूषा उत्कृष्ट होण्यासाठी सौ. संचिता भितळे आणि श्रीम. प्रिती गोनबरे यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. प्रसंगी विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ सदस्यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संयोजन मुख्याध्यापक श्री. भितळे, सहकारी शिक्षक श्री. माने व श्री. जाधव यांनी केले होते. कार्यक्रमाचे स्वरूप पाहून पालक, ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले, तसेच सर्व शिक्षकांना धन्यवाद दिले. विद्यार्थ्याना व उपस्थितांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.