रत्नागिरी : गेले वर्षभर लॉकडाऊन काळात सर्वसामान्य जनता भरडली गेली असतानाच आणि जनतेचे आर्थिक उत्पन्नाची साधनेच बंद असताना कॉन्व्हेंट हायस्कूल पालकांना पहिली फी भरा मगच पुढच्या इयत्तीची पुस्तके आणि ऍडमिशन अशी जबरदस्ती करत होती. जर उत्पन्नच बंद असेल तर पालक पुर्ण फी कशी भरणार आम्हाला थोडी थोडी फी भरायला तयार आहोत अश्या तक्रारी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसकडे आल्या होत्या त्यामुळेच आजच कॉन्व्हेंट हायस्कूल प्रशासनाला जाऊन राष्ट्रवादी युवक आणि विध्यार्थी काँग्रेसने जाब विचारला. त्यावेळी कॉन्व्हेंट प्रशासनाने या पुढे पालकांवर अशी जबरदस्ती न करता हप्त्या हप्त्याने पालकांकडून फी घेऊ अशी ग्वाही दिली.
त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव श्री. बंटी सदानंद वणजू, राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुरज शेट्ये, जिल्हा युवक उपाध्यक्ष पप्पु तोडणकर, युवक शहर अध्यक्ष मंदार नैकर, जिल्हा विध्यार्थी उपाध्यक्ष संकेत कदम, विध्यार्थी शहर अध्यक्ष ऍड. साईजीत शिवलकर, अक्षय माजगावकर उपस्थित होते. या पुढे ज्या ज्या शाळा पालकांवर अशी जबरदस्ती करतील त्या सर्व पालकांना न्याय देण्यासाठी अश्या शाळांना कुलूप लावू अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादी युवक आणि विध्यार्थी काँग्रेस ने घेतली असून तसा ईशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव श्री. बंटी सदानंद वणजू, विध्यार्थी तालुकाध्यक्ष सुरज शेट्ये आणि शहर अध्यक्ष ऍड साईजीत शिवलकर यांनी पालकांवर फी साठी जबरदस्ती करणाऱ्या प्रत्येक शाळेला दिला आहे दिला.
या पुढे अश्या काही तक्रारी असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस विध्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुरज शेट्ये, 9890617222, ऍड साईजीत शिवलकर 8378818576, संकेत कदम 9011831800 यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक व राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस कसून पालकांना करण्यात आले आहे