(लांजा)
आपल्या शाळेतील शाळेत इयत्ता सहावीतील विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापक नथू सोनवणे यांना त्वरित अटक करावी अशी मागणी लांजा आणि रत्नागिरी येथील भाजपा पदाधिकार्यांनी केली आहे.
भाजपा पदाधिकाऱ्यांनी लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटूगडे यांची गुरूवारी २८ एप्रिल रोजी भेट घेतली व संबंधित मुख्याध्यापक नथू सोनवणे यांच्यावर तातडीने कारवाई करताना त्याला अटक करावी अशी आग्रही आणि जोरदार मागणी यावेळी भाजपा पदाधिकार्यांच्या वतीने करण्यात आली.
यावेळी भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस राजेश सावंत, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, जिल्हा चिटणीस प्रशांत डिंगणकर, राजू भाटलेकर, मुकुंद जोशी, लांजा तालुकाध्यक्ष मुन्ना खामकर, तालुका प्रभारी वसंत घडशी, नगरसेवक संजय यादव, मंगेश लांजेकर, मिलिंद लांजेकर, विजय कुरूप, प्रसन्न दीक्षित, शहर अध्यक्ष प्रमोद कुरूप आदी पदाधिकारी उपस्थित होते.