( रत्नागिरी )
मराठा मंदिर ग्लोबल स्कूल आणि युथ फेस्टीवल आर्टिस्ट असोसिएशन आयोजित शिवकिल्ला स्पर्धा मराठा मंदिर ग्लोबल स्कूल येथे सुरू आहे. आज सायंकाळी पारितोषिक वितरण दिमाखदार सोहळ्यात संपन्न होणार.या स्पर्धेसाठी मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
हे स्पर्धेचे पहिलेच वर्ष असले तरीही खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेत एकूण 29 संघ सहभागी झाले आहेत. तरी या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी सायंकाळी ६.०० वाजता पारितोषिक वितरण समारंभ आणि शिव गीतांचा कार्यक्रम ग्लोबल स्कूल रत्नागिरी येथे होणार आहे. सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे युथ फेस्टिवल आर्टिस्ट असोसिएशनचे मुख्य समन्वयक डॉ आनंद आंबेकर यांनी केले आहे.
प्रहर महाकाळ व प्रसिध्द मूर्तिकार स्वप्नील कदम हे या स्पर्धेचे परीक्षण करणार आहेत. स्पर्धा प्रमूख ओंकार बंडबे आणि स्पर्धा आयोजक श्री सचिन लांजेकर आणि ऍड सुरज बने आहेत. या स्पर्धेसाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी चे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी आणि श्री संतोष नलावडे ट्रस्टी मराठा मंदीर मुंबई हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले आहेत.