(रत्नागिरी)
शहरातील माळनाका पुलाखाली व आरोग्य मंदिर येथे राजरोस चालणाऱ्या मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह एकूण २ हजार २४७ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संकेत सुनील शिंदे (वय ३६, रा. जुनीतांबट आळी, रत्नागिरी) व बादल रवी नायर (वय ३८, कर्लेकरवाडी, मारुतीमंदिर, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. हा प्रकार सोमवारी (ता. २९) । दुपारी माळनाका पुलाखाली व आरोग्य मंदिर येथे निदर्शनास आला. पोलिसांनी साहित्यासह संशयित शिंदे यांच्याकडून १ हजार ४२७ रुपये व नायर यांच्याकडून ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल अमोल भोसले व पोलिस नाईक भालचंद्र मयेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.