( रत्नागिरी )
रत्नागिरी शहरातील लोटलीकर हॉस्पिटल येथे ध्वजस्तंभ उभारत असताना तिघांना शॉक लागल्याची माहिती मिळत आहे. उद्या होणार्या प्रजासत्ताक दिनानिमित्त लोटलीकर हॉस्पिटल आवारामध्ये ध्वजस्तंभ उभारण्याचे काम सुरू होते. या दरम्यान अचानक स्तंभ विद्युत डीपीवर पडल्याने शॉक लागून तिघेजण जखमी झाले. ही घटना आज (दि.२५) सायंकाळी घडली. या घटनेत सुधीर पवार, संतोष सोलकर व मारुती शिंदे हे तिघे जखमीं झाले आहेत.
उद्या, गुरुवारी २६ जानेवारी रोजी देशभरात मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. त्यासाठी देशात जय्यत तयारी देखील सुरू आहे. इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत स्वातंत्र झाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी देशाने संविधान लागू केले. त्यामुळे हा दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उद्या होणार्या प्रजासत्ताक दिनानिमित्त लोटलीकर हॉस्पिटल आवारामध्ये ध्वजस्तंभ उभारण्याचे काम सुरू असताना ध्वजस्तंभ थेट जवळच असलेल्या विद्युत डीपीवर पडला. यामध्ये सुधीर, संतोष व मारुती यांना विजेचा जोरदार झटका बसून तिघेजण बाजूला फेकले गेले. या घटनेमध्ये सुधीर हा गंभीर जखमी झाला असून अन्य दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. या तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.