रत्नागिरीः रत्नागिरी तक्रार निवारण कक्षात शहरातील रस्ते खराब असल्याची तक्रारच आली नसल्याचे जिल्हा प्रशासन म्हणत असेल तर ते निखालस खोटे असून महाराष्ट्र समविचारी मंचने याविषयी अनेक नागरिकांसह रितसर ई-मेल द्वारे तक्रार निवेदन दिले असल्याचे समविचारीचे बाबा ढोल्ये,संजय पुनसकर,रघुनंदन भडेकर,निलेश आखाडे आदींनी सांगितले.
शहरातील केवळ खराब रस्त्यांवरच नाही तर नागरिकांच्या मुलभूत सोयी सवलतींवर आम्ही तात्काळ निवेदन देत असतो.आता जिल्हा प्रशासनासह संबंधित यंत्रणेला ती पोहोचत नसतील वा ई-मेल गहाळ होत असतील तर ते ज्या जनतेसाठी आम्ही अवलंब करतो त्यांचे आणि आमचेही दुर्दैव आहे. दिनांक १२ जून रोजी समविचारीच्या अनेकांनी निवेदन दिले आहे.कृपया जिल्हा प्रशासनाने त्यावर कार्यवाही करावी अशी मागणी समविचारीने करुन जिल्हा प्रशासनाच्या एकूण भोंगळ कारभारावर सार्वत्रिक सर्वसामान्य जनतेचा रोष विचारात घेऊन काही निर्णय लवकरच घेण्यात येतील असे सुचित केले आहे.