(रत्नागिरी / प्रतिनिधी)
हातखंबा येथील श्रीकांत उर्फ भाईशेठ मापुसकर आर्ट्स कॉमर्स संयुक्त जुनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्राध्यापक सुभाष रानमाळे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देताना आजच्या ताणतणावाच्या जीवनात शरीर मनाचे स्वास्थ टिकवायचे असेल तर योगासने केली पाहिजे, असे प्रतिपादन केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने प्रा. मनस्वी जाधव यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना योगासनाचे विविध प्रकार यांची माहिती सांगून अनेक प्रात्यक्षिक करून दाखवली. या कार्यक्रमास इयत्ता बारावीचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच प्रा. अनिता पाटील व प्रा. अनन्या पवार आदी उपस्थित होते.