(चिपळूण)
शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालय, खरवते -दहिवलीयेथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांकडून अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत व्यावसायिक दृष्टिकोनातुन विविध कृषि पुरक प्रकल्पाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांचे हस्ते संपन्न झाले.
या विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयामध्ये दुग्धजन्य प्रकीया ,फळे व भाजी पाला प्रकिया, जैविक खत निर्मिती अश्या नाविन्यपूर्ण व संशोधनात्मक प्रकल्पांची सुरुवात करण्यात आली आहे. कृषि क्षेत्रा व्यवसायिक संधीचे माहेर घर म्हणुन नावारूपास आले आहे. कृषि क्षेत्रामध्ये सुद्धा उत्कृष्ट नफा मिळवून देणारे व्यवसाय आहेत व भविष्यामध्ये कृषि पुरक व्यवसायातून निर्मित झालेल्या पदार्थांना बाजारात मोठी मागणी देखील आहे. ही संधी समोर ठेवुन महाविद्यालयामधील विद्यार्थ्यी विविध नाविन्यपूर्ण पदार्थ बनवित आहेत. यामध्ये दुग्धजन्य पदार्थ जसे की सुगंधी लस्सी, मसाला ताक, पनीर, पेढा, सुगंधी दुध तसेच फळे व भाजीपाला प्रक्रिया अंतर्गत विविध प्रकारच्या फळांपासून बनविण्यात आलेल्या कँडी, चटणी, बर्फी, लोणचे, खोबरा बर्फी, आवळा सिरप, विविध भाज्यांपासून उत्तम प्रकारचे पदार्थ विद्यार्थ्यी बनवित आहेत.
महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर याच विद्यार्थ्यांकडून जैविक खत निर्मितीचा प्रकल्प देखील सुरु करण्यात आला आहे. जैविक खते म्हणजे विषमुक्त शेतीचा पाया आहे. भविष्यातील सेंद्रिय खतांची मागणी ओळखुन या विद्यार्थ्यांकडून गांडूळखत, शेणखत बनविण्यात येणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांशी उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांनी सखोल चर्चा करत त्यांना प्रोत्साहन दिले. हे सर्व प्रकल्प यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रकल्प अधिकारी प्रा.बाळासाहेब मुंढे, प्रा.प्रणयकुमार ढेरे, डाॅ.चिन्मय चोरगे, डाॅ.योगिता यादव यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.