(जीवन साधना)
शनिवार हा शनिदेवाच्या पूजेसाठी उत्तम दिवस मानला जातो. शनिदेवाचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी व आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी वेगवेगळया पद्धतीने पूजन सांगितलं गेले आहे.
ज्योतिष शास्त्र अनुसार शनिवारी तेल खरेदी करू नये, असे केल्याने शनीचा कुप्रभाव विपरीत प्रभाव आपल्या संपूर्ण घरावर पडत असतो असे मानले जाते. शनी कृपेसाठी शनिवारी शनिदेवावर तेल अर्पण करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. अनेक लोक शनीवर कोणतेही तेल अर्पण करतात परंतु शनीच्या मूर्तीवर तिळाचे तेल अर्पण करावे, असे खरे शास्त्र आहे. शनीकृपा प्राप्ती व्हावी म्हणून अनेक लोक शनीवर तिळाचे तेल अर्पण करत असतात. परन्तु या परंपरेमागे धार्मिक व ज्योतिषी महत्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार तीलहन म्हणजे तीळ ही भगवान महाविष्णूच्या शरीरावरील मळ आहे, त्यामुळे तीळचे तेल सर्वदा पवित्र मानले गेले आहे (विष्णू पुराण)
तीळ तेल वाहण्याचे धार्मिक महत्व (आनंदरामायण)
हनुमानावर शनीची ग्रह दशाला प्रारंभ झाला त्यावेळी रामसेतू बांधण्याचे कार्य चालू होते. राक्षसगण पुलाला हानी पोहचवणार नाही याची आशंका सदैव असायची. पुलाच संरक्षण करण्याची जवाबदारी ही रामभक्त हनुमानवर होती. शनिदेवाला हनुमानाची शक्ती कीर्ती बद्दल माहिती होती. म्हणून पवनपुत्र वर ग्रह दशेचा फेऱ्याची व्यवस्थाचे नियम सांगताना आपला आशय सांगितला. त्यावर हनुमान म्हणाले की, प्रकृतीच्या नियमांचे उल्लंघन करण्याची माझी इच्छा नाही. पण रामसेवा सर्वस्वी आहे. हनुमानाचे म्हणणे होते, की राम कार्य पूर्ण झाल्यावर मी माझे शरीर सर्वस्वी तुम्हाला अर्पण करेन. परंतु शनी देवाला हे मान्य नव्हते, त्यांनी ते स्वीकारलं नाही आणि जसे शनी देव अरुप म्हणजे अदृश्य होऊन हनुमानाच्या शरीरवर आरूढ झाले, त्यावेळी हनुमान पर्वतांना ठोकर मारू लागले.
शनी देव हनुमानाच्या शरीरावर ज्या ज्या ठिकाणी आरूढ होते त्या त्या ठिकाणी हनुमानाने पर्वतांना ठोकर दिले. त्याचे फलस्वरूप शनिदेव खूप घायाळ झाले. शरीरातील प्रत्येक अंग असह्य वेदनांनी जर्जर झाले व त्यांनी हनुमानाची माफी मागितली. त्यावेळी हनुमानाने शनी देवाकडून वचन सोडवले की, त्यांच्या भक्तांना ते कधी कष्ट पीडा देणार नाहीत. असे वचन दिल्यानंतर शनी देवाला हनुमानाने तिळ तेल दिले ते शनिदेवाने सर्व अंगाला लावले व त्यांची पीडा कमी झाली त्यावेळ पासून शनीला तेल अर्पण करण्याची प्रथा रूढ झाली.
तीळाचे तेल अर्पण करण्यामागचे ज्योतिष महत्व
ज्योतिषशास्त्र अनुसार शनीचे धातू सिस व लोखंड लोह आहे. याला संस्कृतमध्ये नाग म्हणतात, या धातूपासून शेंदूरची निर्मिती होते. शिस धातू एक विष देखील आहे. तंत्र शास्त्रात देखील याचे उपयोग आहे. शेंदूर वर मंगळ ग्रहाचे अधिपत्य आहे. लोखंड पृथ्वीमधून निघते व मंगळ ग्रह भूमी पुत्र आहे. मंगळ ग्रह चा धातू तांबे जरी असला तरी लोखंड सुद्धा मंगळ ग्रहाचे प्रतीक मानले गेले आहे. लोखंड आणि तेल यांचा मित्र भाव आहे. तेल लोखंडला सुरक्षित देखील ठेवतात. लोहाला गंज लागू देत नाही, म्हणजे जर मंगळ ग्रह प्रबळ असेल तर शनीचा दूषप्रभाव हा कमी होतो. म्हणून शनी ग्रहाला शांत करण्यासाठी तिळाचे तेल अर्पण करावे.