(खेड)
भरणे येथील साई रिसॉर्टजवळ व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक करण्यात आली होती. या तिघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बाळू दगडू पवार (42, रा. धामणे-महाड), संदीप का†शनाथ चव्हाण (47, रा. बारसगाव-महाड), संतोष सीताराम गायकवाड (57, रा. लोहारमाळ-पोलादपूर) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
हे तिघेजण महाड येथून दोन दुचाकीवरून व्हेल माशाची उलटी विक्री करण्यासाठी भरणे येथील साई रिसॉर्ट जवळ येणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला होता. या सापळ्यात तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यांच्याकडून 1 किलो 84 ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली. 2 दुचाकी व 1 मोबाईलही हस्तगत करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.