(संगलट / वार्ताहर)
विद्यार्थ्यांचे मन मेंदू आणि मनगट सक्षमीकरण करणेसाठी दापोली तालुका शिक्षण विभागाने कंबर कसली असून तसे गत पाच वर्षात ज्याची फलनिष्पत्ती मिळाली आहे अशा व्हिजन दापोलीच्या शिष्यवृत्ती उपक्रमातील सन २०२३/२४ साठी बुधवारी दि.२७ डिसेंबर रोजी ५०४ विद्यार्थी पहिल्या चाचणीला सामोरे गेले.
या २७ केंद्रांमध्ये नियोजीत पहिली चाचणी संपन्न झाली असून,चाचणी परीक्षेनंतर तिथेच प्रत्येक केंद्रातील तज्ञमार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले. दरम्यान पर्यवेक्षीय यंत्रनेने सदर परीक्षा केंद्रांना भेटी देऊन समाधान व्यक्त केले. अंतिम परीक्षेपर्यंत किमान सहा सराव परीक्षा केंद्रस्तरावर होणार असून तसा सराव आणि प्रात्यक्षिक प्रत्येक शाळेत सुरु आहे.