(रत्नागिरी)
तालुक्यातील जयगड येथे वाळू व्यवसायासाठी १ कोटी २१ लाख २५ हजार रुपये घेऊन त्यापैकी फक्त ११ लाख २५ हजार रुपये परत करत फसवणूक करणाऱ्या विरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीची ही घटना २० मे २०२० ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत घडली आहे.
कमलेश विद्याधर सुर्वे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात चंद्रशेखर वसंत गडदे यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. कमलेश सुर्वेने त्यांच्याकडून मे २०२० ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत वाळू व्यवसायाचे प्रतिटन २५० रुपये मोबदला देतो असे सांगून १ कोटी २१ लाख २५ हजार रुपये घेतले होते. त्यापैकी कमलेशने फक्त ११ लाख २५ हजार रुपये चंद्रशेखर गडदे यांना परत केले. उर्वरित १ कोटी १० लाख रुपये परत न करता कमलेशने फसवणूक केली असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.