(नवी दिल्ली)
एअर इंडियाच्या एका वैमानिकाने त्याच्या मैत्रिणीला विमानाच्या कॉकपिटमध्ये बसवल्याने एअर इंडियाने या पायलटला ३ महिन्यांसाठी निलंबित केले आहे. यासोबतच DGCA ने एअर इंडियाला ३० लाखांचा दंड देखील ठोठावला आहे. वैमानिकाने नियमांचे उल्लंघन केल्याने त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली.
DGCA ने दुबई-दिल्ली उड्डाण प्रकरणात सुरक्षेच्या बाबतीत हलगर्जीपणा केल्याने एअर इंडिया ला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दिल्ली-दुबई उड्डाणावेळी AI ९१५ च्या पायलटने २७ फेब्रुवारी रोजी नियमांचेउल्लंघन करताना आपल्या मैत्रिणीला कॉकपिटमध्ये बसण्यास परवानगी दिली.
DGCAच्या निवेदनानुसार सुरक्षा सर्वात संवेदनशील मुद्दा आहे. विमान नियम १९३७ नुसार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग आणि DGCA नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणात पायलटचे लायसेंस तीन महिन्यासाठी निलंबित केले आहे. डीजीसीएने को-पायलटलाही यावेळी त्याला थांबले नसल्याने त्याला वार्निंग देण्यात आले आहे.
DGCA ने सांगितले की, एअर इंडियाचे सीईओकडे याप्रकरणी फ्लाइटमधील ऑपरेटिंग क्रू मेंबरकडून तक्रार आली होती. सुरक्षा संबंधी मुद्दा असूनही एअरलाइनने तात्काळ कारवाई केली नाही. त्यानंतर DGCAने एअर इंडियालासंवंधित पायलट व प्रवाशांवर ठराविक काळात कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
दिल्ली येथून दुबईला जाणाऱ्या एअर इंडिया फ्लाइट AI-915 या फ्लाईटमध्ये पायलटने त्याच्या मैत्रिणीला कॉकपिटमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली होती. यावेळी या पायलटने त्याच्या मैत्रिणीला विशेष ट्रीटमेंट देखील दिली होती. या प्रकरणाच्या तपासात पायलट दोषी आढळला आहे.