(निवोशी/गुहागर : उदय दणदणे)
महात्मा फुले जलभूमी संधारण अभियान “मिशन बंधारे -२०२२-२०२३” उपक्रम हाती घेऊन सोमवार, दिनांक-१६ जानेवारी -२०२३ रोजी गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत वेळंब च्या माध्यमातून वेळंब- कातळवाडी नदी ठिकाणी वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी वेळंब ग्रामपंचायत सरपंच -सौ समीक्षा बारगोडे, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच गुहागर तालुका कृषी अधिकारी व वेळंब (कातळवाडी) ग्रामस्थ व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.